हे म्हणजे अगदी स्वैर-स्वैर-स्वैर भाषांतर आहे.
चाफा
समज, मी जर असंच मजा म्हणून चाफ्याचं फूल झालो तर? मग मी झाडाच्या सर्वांत उंच फांदीवर चढून बसेन आणि वाऱ्याच्या झुळकेबरोबर मजेत झोके घेत पालवीवर नाचेन, मग तू मला ओळखशील का गं आई?
तू हाक मारत राहशील, “सोन्या, कुठे आहेस रे तू?” तेव्हा मी स्वत:शीच हसेन पण अगदी चिडीचूप बसेन.
नंतर तू तुझ्या कामात गुंतल्यावर मी माझ्या पाकळ्या अलगद उघडून तुझ्याकडे पाहत राहीन.
मग न्हाऊन झाल्यावर तू तुझे मोकळे ओले केस घेऊन अंगणात येशील आणि चाफ्याच्या सावलीतल्या तुझ्या नेहमीच्या जागी उभी राहून स्तोत्रं म्हणशील. तेव्हा माझा गंध तुझ्यापर्यंत पोहोचेल, पण तो गंध माझा आहे, हे काही तुझ्या लक्षात येणार नाही.
मग दुपारच्या जेवणानंतर जेव्हा तू खिडकीत रामायण वाचत बसशील तेव्हा झाडाची सावली तुझ्या केसांवर आणि मांडीवर पडेल. तेव्हा मी असा उभा राहीन की माझी इवलीशी सावली पुस्तकाच्या पानावरच्या तू वाचत असलेल्या ओळीवर नेमकी पडेल.
पण ती सावली तुझ्या सोन्याची आहे, हे तुला कळेल का?
मग संध्याकाळी जेव्हा तू एका हातात कंदील घेऊन गोठ्यात जाशील, तेव्हा मी टपकन जमिनीवर पडेन, परत एकदा तुझं छोटं बाळ होईन आणि तुझ्याकडे गोष्ट सांगण्याचा हट्ट धरेन.
मग तू विचारशील “बदमाशा, होतास कुठे तू दिवसभर?”
आणि मी एवढंच म्हणेन “ते किनई आमचं गुपित आहे.”
नोव्हेंबर 27, 2006 @ 18:29:08
haa.haa.. 🙂 sahich.
नोव्हेंबर 27, 2006 @ 21:11:32
🙂 फारच उत्तम उपक्रम सुरू केलाय तुम्ही! ‘Cresent Moon’ is indeed the epitome of how imaginative “children’s poems” could be! आणि ही ‘चाफ्याचा फुला’ची कविता तर फार म्हणजे फारच सुंदर आहे. तुमचं भाषांतर उत्तम वठलंय अगदी. ती ‘समुद्रकिनाऱ्या’वरची पण करा नं अनुवादित!
नोव्हेंबर 29, 2006 @ 01:28:31
chaafa- phaarach chaan . khUpa aavadla
नोव्हेंबर 30, 2006 @ 23:32:42
उत्कृष्ट ! तुमच्या उपक्रमाचे मनापासून कौतुक करावेसे वाटते.
– मिलिंद
डिसेंबर 23, 2006 @ 16:59:09
सुंदर!