पुन्हा परिचय
आपल्या व्यक्तिमत्त्वातल्या ‘अपडेट’सोबत ब्लॉगवरचा आपला परिचयही ‘अपडेट’ केला पाहिजे, नाही का? त्यामुळे माझा परिचय पुन्हा नव्याने-
नमस्कार,
मी अर्चना. पाच वर्षांपूर्वी हा ब्लॉग सुरू केला तेव्हा विद्यार्थिनी होते, आता पोटार्थिनी झाले आहे. भाषाविषयक संशोधन आणि भाषांतर ही माझी अर्थार्जनाची साधने. शिवाय छंद म्हणून अशी काही कामे विनामोबदलाही करत असते. फावल्या वेळात पुस्तके वाचण्याचे आणि सिनेमे पाहण्याचे मला व्यसन आहे. भाषांवर (सर्व) अतोनात प्रेम आहे.
या ब्लॉगवर मी विद्यार्थीदशेत असताना लिहिलेले थोडे-फार अभ्यासपूर्ण लेख आहेत. आता तसा अभ्यास करायला वेळ मिळत नाही. त्यामुळे नुसतेच मनात आलेले विचार, कल्पना, नवीन घडलेले किस्से अशा स्वरुपाच्या पोस्ट्स आता या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळतील.
तुम्हाला हा ब्लॉग आवडेल अशी आशा आहे.
-अर्चना आंबेरकर
सप्टेंबर 17, 2011 @ 05:42:38
रिप्लाय दिसत नाही. दोनदा प्रयत्न केला.
सप्टेंबर 17, 2011 @ 05:44:35
आता दिसतो आहे. 🙂
सप्टेंबर 17, 2011 @ 05:49:22
पुन्हा रिप्लाय दिले. परंतु, दिसत नाहीत. रिप्लाय फारच मूडी दिसतात. ः))
सप्टेंबर 17, 2011 @ 05:56:25
तूर्तास, शेवटचा प्रयत्न करतो.
आपण कृपया माझा भाषांतरावरील ब्लॉग पाहावा.
छापील शब्द.वर्डप्रेस.कॉम
छापील ः एचटीटीपी कोलन दोन फॉर्वर्ड स्लॅशेस सी एच ए ए पी इ इ एल एस एच ए बी डी ए
सप्टेंबर 20, 2011 @ 04:33:05
नमस्कार,
माझा एक मित्र व्यावसायिक पातळीवर भाषांतरे करतो. त्याला मदतीची गरज असते.
तुमची हरकत नसेल तर तुमचा संपर्कपत्ता त्याला देण्याची परवानगी द्यावी.
सप्टेंबर 20, 2011 @ 07:57:13
जरूर, धन्यवाद.
ऑक्टोबर 15, 2011 @ 05:11:36
Hallo Archanaji,
Tumcha Bhashantarababatcha lekh aawadla. Mi ek divali ank kadhato aahe. To lekh chapava ase vatate. Tumchi parvangi havi aahe. Jar tumahala parvangi dyavi vatli tar mazya mail id var lekh pathava hi vinanti.
kalave,
Subhash Sabnis,
subhashsabnis@gmail.com
ऑक्टोबर 22, 2011 @ 12:46:49
माझ्या ब्लॉगवरचा तुमचा प्रतिसाद मी ब-याच दिवसांनी वाचला. क्षमस्व.
तुमच्या ब्लॉगला नुकतीच भेट दिली. भाषा विषयावरचे लेख रंजक आहेत. आवडले.
ऑक्टोबर 24, 2011 @ 07:01:38
धन्यवाद, सौरभदा. 🙂
मे 30, 2012 @ 11:32:58
good
ऑगस्ट 09, 2012 @ 12:10:05
अर्चना……तुमचे लिखाण फार छान आणि विशेष म्हणजे त्या लिहिण्यात एक विशिष्ट लय आहे.