मराठीत समृद्ध कोशवाङ्मय आहे, असे एक विधान नेहमी केले जाते. या विषयावर बर्यापैकी लेखनही केले गेले आहे. असे असूनही, या सर्व कोशवाङ्ममयाची एकत्रित यादी मिळवताना मात्र नाकी नऊ येतात. बर्याचदा भाषाभ्यासक, मराठीतून लेखन करणारे लेखक, भाषांतरकार, अनुवादक यांना या कोशांची गरज भासते, परंतु माहितीच्या अभावी ते या कोशांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे या लेखात या कोशांची एक यादी करण्याचा प्रयत्न करते आहे. जेणेकरून इतरांना मराठीच्या शब्दकोशांचा शोध घेणे सोपे जाईल. आपल्याला जर या यादीतील कोशांव्यतिरिक्त कोणते मराठी शब्दकोश माहीत असतील, तर कृपया आपल्या प्रतिसादांत त्याचे नाव, प्रकाशकाचे नाव इ. माहिती द्या. म्हणजे एकाच ठिकाणी एक चांगली यादी तयार होईल.
जेव्हा आपण ’कोशवाङ्मय’ हा शब्द वापतो, तेव्हा त्यात दोन प्रकारचे कोश अंतर्भूत होतात.
१- आपल्या परिसरातील वस्तू, प्राणी, व्यक्ती, सांस्कृतिक संकल्पना इ. गोष्टींची माहिती देणारे कोश. उदा. संस्कृतीकोश, विश्वकोश इ.
२- भाषेतील शब्द आणि त्यांचे अर्थ यांची माहिती देणारे कोश. उदा. ऑक्सफर्डचा इंग्रजी-मराठी शब्दकोश.
येथे जी यादी केली जाणार आहे, त्यात दुसऱ्या प्रकारचे शब्दकोश असतील.
————————————————————————-
मराठी भाषेतील शब्दांचे मराठीत अर्थ/इतर माहिती देणारे कोश-
१- अभिनव मराठी-मराठी शब्दकोश (५ खंड) – द. ह. अग्निहोत्री – व्हीनस प्रकाशन
२- महाराष्ट्र शब्दकोश (८ खंड)- दाते, कर्वे- वरदा प्रकाशन
३- मराठी शब्दकोश- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ (या शब्दकोशाचे २ खंड येथे उपलब्ध आहेत-http://mahasahityasanskriti.maharashtra.gov.in/shoabdakosh.htm)
४- मराठी व्युत्पत्ति कोश- कृ. पां. कुलकर्णी- शुभदा-सारस्वत प्रकाशन
५- मराठी लाक्षणिक शब्दकोश- र. ल. उपासनी- साहित्य प्रसार केंद्र, नागपूर
६- पर्याय शब्दकोश- वि. शं. ठकार- नितीन प्रकाशन
७- विस्तारित शब्दरत्नाकर- वा. गो. आपटे, ह. अ. भावे- वरदा प्रकाशन
८- समानार्थी, विरुद्धार्थी शब्दकोश- य. ना. वालावलकर- वरदा प्रकाशन
९- मराठीतील एकाक्षरी शब्दांचा लघुकोश- भा. म. गोरे- वरदा बुक्स
१०- ग्रामीण बोलीचा शब्दकोश- द. ता. भोसले- मेहता पब्लिशिंग हाऊस
११- गावगाड्याचा शब्दकोश (संपादक, प्रकाशक यांची माहिती उपलब्ध नाही)
१२- मराठी अंत्याक्षरी शब्दकोश- हरिश्चंद्र बोरकर- अनुबंध प्रकाशन
१३- संख्या संकेत कोश- श्री. शा. हणमंते- प्रसाद प्रकाशन
१४- संकल्पनाकोश (आतापर्यंत १ खंड प्रकशित झाला आहे)- सुरेश पांडुरंग वाघे- ग्रंथाली
१५- व्यावहारिक मराठी शब्दार्थकोश- मो. वि. भाटवडेकर- राजहंस प्रकाशन
१६- मराठी लेखन-कोश- अरुण फडके- अंकुर प्रकाशन
मराठी भाषेतील शब्दांचे इंग्रजीत अर्थ/इतर माहिती देणारे कोश-
१- मराठी-इंग्रजी शब्दकोश- मोल्सवर्थ
२- सुबोध मराठी-इंग्रजी शब्दकोश- कृ. भा. वीरकर- अनमोल प्रकाशन
३- मराठी- इंग्रजी शब्दकोश- ह. अ. भावे- वरदा बुक्स
४- वाक्यकोश (३ खंड)- वामन केशव लेले- राजहंस प्रकाशन
५- मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी- वा. गो. आपटे- वरदा प्रकाशन
६- मराठी-इंग्रजी शब्दकोश- एम. के. देशपांडे- परचुरे प्रकाशन
इंग्रजी भाषेतील शब्दांचे मराठीत अर्थ/इतर माहिती देणारे कोश-
१- इंग्रजी-मराठी शब्दकोश- र. वा. धोंगडे- ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस
२- नवनीत ऍडव्हान्स्ड डिक्शनरी- सुधाकर प्रभुदेसाई- नवनीत प्रकाशन
३- ए कॉम्प्रिहेन्सिव्ह डिक्शनरी, इंग्लिश ऍंड मराठी- बाबा पद्मनजी- एज्युकेशन सोसायटी प्रेस
इंग्रजी-मराठी पारिभाषिक शब्दकोश-
अ- भाषा संचलनालयाचे परिभाषा कोश-
१- साहित्य समीक्षा परिभाषा कोश
२- वृत्तपत्र विद्या परिभाषा कोश
३- शारीर परिभाषा कोश
४- कृषिशास्त्र परिभाषा कोश
५- वाणिज्यशास्त्र परिभाषा कोश
६- मानसशास्त्र परिभाषा कोश
७- औषधशास्त्र परिभाषा कोश
८- प्रशासन वाक्प्रयोग
९- न्यायवैद्यक व विषशास्त्र परिभाषा कोश
१०- धातुशास्त्र परिभाषा कोश
११- विद्युत अभियांत्रिकी परिभाषा कोश
१२- संख्याशास्त्र परिभाषा कोश
१३- भाषाविज्ञान व वाङ्मयविद्या परिभाषा कोश
१४- भौतिकशास्त्र परिभाषा कोश
१५- व्यवसाय व्यवस्थापन परिभाषा कोश
१६- यंत्र अभियांत्रिकी परिभाषा कोश
१७- पदनाम कोश
१८- रसायनशास्त्र परिभाषा कोश
१९- ग्रंथालयशास्त्र परिभाषा कोश
२०- शिक्षणशास्त्र परिभाषा कोश
२१- गणितशास्त्र परिभाषा कोश
२२- विकृतिशास्त्र पारिभाषिक शब्दावली
२३- भूगोलशास्त्र परिभाषा कोश
२४- न्याय व्यवहार कोश
२५- वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा (गणितशास्त्र, वास्तवशास्त्र, रसायनशास्त्र)
२६- वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा (वनस्पतिशास्त्र)
(यातले बरेचसे पारिभाषा कोश येथे उपलब्ध आहेत-http://www.marathibhasha.com/index.html).
ब. डायमंड पब्लिकेशन्सचे परिभाषा कोश
१- अर्थशास्त्र शब्दकोश- वि. ज. गोडबोले
२- मानसशास्त्र शब्दकोश- मुकुंद इनामदार
३- शिक्षणशास्त्र शब्दकोश- बेनझीर तांबोळी
४- ग्रंथालयशास्त्र शब्दकोश- सुजाता कोण्णूर
क. प्रगती बुक्सचे परिभाषा कोश
१- कॉमर्स डिक्शनरी- जोशी, परदेशी
२- सायन्स डिक्शनरी- विकास जोशी
३- इकॉनॉमिक्स डिक्शनरी (संपादकाचे नाव उपलब्ध नाही)
४- लॉ डिक्शनरी (संपादकाचे नाव उपलब्ध नाही)
५- मेडिकल डिक्शनरी (संपादकाचे नाव उपलब्ध नाही)
६- टेक्निकल डिक्शनरी (संपादकाचे नाव उपलब्ध नाही)
७- कम्प्युटर डिक्शनरी (संपादकाचे नाव उपलब्ध नाही)
ड- इतर परिभाषा कोश
१- भौगोलिक शब्दकोश- र. भा. नाईक- वरदा बुक्स
मराठी-इंग्रजी पारिभाषिक शब्दकोश-
१- भौतिकशास्त्र पारिभाषिक शब्दावली- भाषा संचलनालय
तुमच्या मदतीने ही यादी पुढे वाढत जाईल अशी आशा करते.
जुलै 04, 2012 @ 04:26:36
This is a great beginning. Thanks for initiating a very valuable step. Most of the Koshas I know of are already here. I will surely add if I come across any new entries. Congratulations!
जुलै 04, 2012 @ 05:00:05
Nice collection it is helpful for all the translators and other people who want to do something in Marathi.I will plus one the list as early as possible. Great work!