एक नवी रेसीपी

मेसमध्ये ताटात चवळीचं (चवळी हे कडधान्य. चवळीची पालेभाजी नव्हे) वरण वाढलेलं बघून मला भाताची नवी रेसीपी शोधून काढण्याची प्रेरणा मिळाली. ताटातले इतर पदार्थ बघून मला तशी एक रेसीपी सुचली सुद्धा, आणि करून बघितल्यावर ती एकदम फक्कड झाली. त्यामुळे आता ती इथे टाकत आहे. आणि माझ्यासारख्या रंजल्या-गांजल्या हॉस्टेलवासीयांना पुढील पाककृती समर्पित करते आहे.

साहित्य-
भात
कोणतेही लोणचे
दही
बारीक किंवा उभा चिरलेला कच्चा कांदा
मीठ

आधी भात वाढून घ्यावा. त्यावर लोणच्याच्या खारची धार सोडावी. लोणच्यातल्या थोड्या फोडी घालाव्यात आणि भात लालेलाल करून टाकावा. मग त्यात दही घालावे. वर कच्चा कांदा घालावा आणि चवीनुसार मीठ टाकावे. हे सगळे नीट मिसळून घ्यावे आणि खावे.

आहे की नाही साधी सुधी आणि हॉस्टेल-मेसमध्ये उपलब्ध साधनांनी बनवता येणारी पाककृती? (फक्त त्या लोणच्याचा लोचा आहे. तेवढे लोणचे आईकडून आगाऊ तयार करून घेतल्यास आणि बाटलीत भरून सोबत नेल्यास बरे पडेल.)

आता पोटभर जेवा!

3 प्रतिक्रिया (+add yours?)

  1. Avani
    ऑक्टोबर 18, 2009 @ 04:00:02

    अशीच अजून १ क्रुती आहे
    भात वाढून घ्यावा
    पापड भाजून घ्यावेत.
    पापडाचा चूरा करून भातावर घालावा.
    त्यात थोडेसे तेल, तिखट, चवीपुरते मीठ घालून कालवून खावे.

    पापड भाजून घ्यावेत.
    पापडाचा चूरा करावा.
    त्यात थोडेसे तेल, तिखट, चवीपुरते मीठ घालून चटणी करावी.

    उत्तर

  2. ASHWINI
    डिसेंबर 28, 2009 @ 16:03:27

    BATATE VADE – APPAIATUS – POTATO, ONION, MOHARI, JIRA, BESAN PITH, WOTAR,

    उत्तर

  3. ASHWINI SACHIN DHANAVADE
    डिसेंबर 28, 2009 @ 17:45:58

    TOMATO RICE – APPAIATUS – RICE, TOMATO, ONION, MIRACHI – – OLI, JIRA MOHARI

    उत्तर

Leave a reply to ASHWINI SACHIN DHANAVADE उत्तर रद्द करा.