चंद्रकोर- ६

दुष्ट पोस्टमनकाका

ए आई, तू अशी जमिनीवर इतकी गप्प गप्प का बसलीयेस गं, ए आई सांग ना गं?

अगं बघ तरी, तुझ्या मागची खिडकी उघडीच राहिलीये आणि त्यातून पावसाचे मोठाले थेंब आत येऊन तुला भिजवतायत. तू तिथून उठत का नाहीस?

 ते ऐकलंस का? ४ चे ठोके वाजले. दादाची शाळेतून घरी यायची वेळसुद्धा झाली. काय झालंय तरी काय, तुझा चेहरा का एवढा पडलाय?

तुला आज बाबांचं पत्र नाही का मिळालं? ते पोस्टमनकाका बरे अख्ख्या गावाला आपल्या पिशवीतून पत्रं वाटत फिरत असतात, फक्त आपल्या बाबांचंच पत्र तेवढं स्वतः:जवळ ठेवून घेतात होय! दुष्ट कुठले!

पण आई, तू कशाला याचं एवढं वाईट वाटून घेतेस? एक काम कर, उद्या शेजारच्या गावात आठवड्याचा बाजार भरणार आहे. तिथून आपल्या कामवाल्या बाईंना थोडे कागद आणि पेन घेऊन यायला सांग.

मी स्वतः: माझ्या हातांनी लिहीन बाबांची सगळी पत्र. तुला शोधूनही एकसुद्धा चूक सापडणार नाही. मी क पासून ध पर्यंत सगळं लिहीन.

पण तू अशी हसतेस काय गं? मी बाबांसारखी छान छान पत्र लिहू शकत नाही असं वाटतंय का तुला?

पण तू बघच, मी त्या कागदावर नीट ओळी आखून घेईन आणि त्यावर छान मोत्याच्या दाण्यासारख्या अक्षरात लिहीन.

आणि पत्र लिहून पूर्ण झाल्यावर ते बाबांप्रमाणे त्या दुष्ट पोस्टमनकाकांच्या पिशवीत टाकून देण्याइतका मूर्ख वाटलो का मी तुला? मी स्वतः: येईन तुझ्याकडे ते पत्र घेऊन, कुणासाठीही न थांबता आणि माझ्या पत्रातलं अक्षर अन अक्षर वाचायला तुला मदत करीन.

मला माहीत आहे, त्या पोस्टमनकाकांना तुला सर्वांत छान पत्र दिलेली आवडत नाहीत ते!

5 प्रतिक्रिया (+add yours?)

 1. hemant surat
  डिसेंबर 25, 2006 @ 18:21:18

  तुझ्याही ब्लॉगवरील पोस्टाची आम्ही वाट पाहतो. पण नाही आले तर तक्रार तरी कुठे करणार? गुरूदेव टागोर जर मराठीत बोलले असते तर हेच ऎकायला मिळाले असते आम्हाला. तुझे साहित्यिक नाव आता ‘ अर्चना टागोरकर’ ठेवायला हवे.

  उत्तर

 2. उदय
  डिसेंबर 25, 2006 @ 23:49:28

  अनुवादाचा प्रयत्न चांगला आहे… टागोर बरेच मराठीत आलेत… पुलंच्या आजोबांनी गीतांजलीचा अभंगरूप अनुवाद केला आहे… जरा दीर्घ व नवे काहीतरी अनुवादासाठी निवडा आम्हाला वाचायला आवडेल

  उत्तर

 3. datta shelar
  डिसेंबर 29, 2006 @ 16:45:58

  sunder lihila aahes.best of luck, go ahed.

  उत्तर

 4. प्रमोद देव.
  डिसेंबर 30, 2006 @ 06:32:31

  मस्त लिहिले आहेस! अशीच लिहित रहा!

  उत्तर

 5. Vinayak
  जानेवारी 04, 2007 @ 22:27:52

  sundar…farach chhan !

  उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: