चंद्रकोर

कालच चर्चगेटची बुक स्ट्रीट फिरता फिरता रविंद्रनाथ टागोर यांचं ‘The Crescent Moon’ हे पुस्तक अवघ्या १० रु. ना मिळालं. टागोरांचं पुस्तक म्हणून मी मोठ्या कुतुहलाने विकत घेतलं आणि आज सकाळी वाचायला म्हणून ते जे हातात घेतलं, ते पूर्ण वाचूनच खाली ठेवलं.

तळहाताएवढ्या या इवल्याशा पुस्तकात टागोरांच्या ४१ बंगाली कवितांच्या त्यांनी स्वत: केलेल्या इंग्रजी अनुवादांचा संग्रह आहे. अर्धं पान ते ३ पानं अशा लांबीच्या या एवढ्याएवढ्याशा लघुलेखांतून आई आणि तिचं बाळ यांचं जे रम्य विश्व टागोरांनी उभं केलं आहे, ते वाचून आपणही परत त्याच विश्वात जावं असं वाटू लागतं. चंद्रकोरीप्रमाणे मोठी होत जाणारी मुलं आणि त्यामुळे आईशी असलेल्या त्यांच्या नात्यात पडत जाणारा बदल हेही टागोरांनी खूप चांगल्या रीतीने टिपले आहे.

हे पुस्तक वाचत असतानाच त्याचा अनुवाद करावा असं वाटू लागलं, म्हणून हा प्रयत्न करते आहे. चुकलं माकलं तर माफ करा.

 

घर

 

शेतातल्या वाटेवरून मी एकटाच चाललो होतो, तेव्हा एखाद्या कवडीचुंबकाप्रमाणे सूर्यास्त आपली शेवटची सोनकिरणं चोरून घेत होता. प्रकाश कमी कमी होत अखेर अंधारात विलीन झाला आणि पिकं कापून काढल्यामुळे बोडकी झालेली जमीन ओठ मिटून गप्प बसली.

इतक्यात अचानक एका मुलाच्या खड्या सूरांनी आकाश व्यापलं. तो मुलगा अंधार कापत पलिकडे निघूनही गेला, मला न दिसताच! पण संध्याकाळच्या शांततेवर आपल्या गाण्याचा माग सोडून गेला.

माळाच्या टोकाशी असलेल्या गावात त्याचं घर होतं, ऊसमळ्याच्या पल्याड; केळीच्या, फणसाच्या नि ताडामाडाच्या सावलीत लपलेलं.

चांदण्याने आच्छादलेल्या माझ्या एकाकी वाटेवर मी क्षणभर थबकलो आणि समोरच्या अंधारलेल्या धरतीकडे पाहू लागलो. तिच्या कुशीत वसली होती असंख्य घरे; त्यात होते पाळणे, पलंग, आईचं काळीज, लामणदिवे आणि आपल्याच आनंदात रममाण झालेले अनेक कोवळे जीव, ज्यांना माहितही नाही की त्यांचा हा आनंद जगासाठी किती मोलाचा आहे!

Advertisements

2 प्रतिक्रिया (+add yours?)

 1. hemant _surat
  नोव्हेंबर 20, 2006 @ 15:00:32

  टागोरांच्या कविता म्हणजे शाळेत सरांनी सांगावे अर्थाचे पदरामागून पदर आणि आम्ही अधाशासारखे अजून काही ते सांगताहेत का ते आसुसलेल्या मनाने बघणं.
  अतिशय सुंदर रूपांतर केले आहेस.

  Why o! Why, I was tempted to larry lured by the boatman’s song
  हे शब्दं english मध्ये खूप काही सांगून जातात. १९७० साली ऐकवलेली कविता अजूनही मनात घर करून आहे.

  उत्तर

 2. Nandan
  नोव्हेंबर 21, 2006 @ 04:46:27

  uttam. ajoon asech sundar kavitanche anuvaad vaachaayalaa aavaDateel.

  उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: