भाषाशास्त्राबद्दल थोडे…

या मे महिन्यातच माझी पदवीपरीक्षा संपली आणि सर्व परिचित अपरिचितांनी ‘आता पुढे काय?’ आणि तत्सम प्रश्नांची बोलिंग करायला सुरुवात केली. सुरुवातीला ‘अजून ठरलेले नाही’ मग ‘पदव्युत्तर शिक्षण घ्यावे की नाही, याचा विचार चालू आहे.’ पुढे ‘पदव्युत्तर शिक्षण कशात घ्यावे हे ठरवते आहे.’ अशी माझी उत्तरे बदलत बदलत गाडी अखेर ‘भाषाशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेणार’ (साध्या शब्दात Linguistics मधे M.A. करणार) या थांब्यावर येऊन पोहोचली.

तरी प्रश्नांची बोलिंग अजून संपली नव्हती. ‘हे भाषाशास्त्र म्हणजे नक्की आहे तरी काय?’ , ‘तिथे तुम्हाला कोणत्या भाषा शिकवणार?’, ‘म्हणजे तू आता भाषांची शास्त्रज्ञ होणार का, हे हे हे’ ‘तू तर मराठी व्याकरणातही चूका करतेस, तुला तिथे घेणार कोण आणि कसं?’ असे अनेक चेंडू परतवताना माझ्या नाकी नऊ आले. कारण , भाषाशास्त्र म्हणजे नक्की काय हे मला तरी कुठे ठाऊक होतं? मी द्यायचे आपली काहीतरी थातुर मातुर उत्तरं ठोकून.

 

 

तर चुकतमाकत, थोडं भीत भीत, भाषाशास्त्राशी थोडीफार तोंडओळख झाली. या उण्यापुऱ्या ३ महिन्यांच्या ओळखीवर भरवसा ठेऊन या माझ्या नव्या दोस्ताचा तुम्हालाही परिचय करून द्यावा, म्हणून हा पांढऱ्यावर काळं गिरमिटवण्याचा प्रपंच!

 

सर्वप्रथम एक सांगते, की यात आम्हाला कोणतीही भाषा शिकवत नाहीत. तर सर्व भाषांत सामायिक असणारे विविध पैलू दाखवले जातात. प्रत्येक पैलूचं रुप भाषेनुरूप कसं बदलत जातं, तेही दाखवलं जातं. आता हे पैलू कोणते ते पाहू- भाषाशास्त्रात भाषेच्या लेखनाचा व पर्यायाने लिपींचा फारसा विचार केला जात नाही. मुख्य भर असतो तो उच्चारणावर म्हणजेच Phonetics वर. हा विषय अत्यंत मजेदार आहे. फुप्फुसांतून येणाऱ्या हवेला Vocal Tract  मधील Glottis , Larynx , पडजीभ, टाळू, दातांच्या वरचा भाग, दात, ओठ आणि जीभ हे सगळे मिळून कसे आकार देतात, आणि त्यामुळे तोंडातून कसा उच्चार बाहेर पडतो, ह्या अवयवांच्या हालचालीतला सूक्ष्मातिसूक्ष्म फरक उच्चाराच्या रुपड्यात कसा काय बदल घडवून आणतो हे समजून घेणं फार रोचक आहे.

 

मग हे सगळे उच्चार एकत्र येऊन त्यांचा शब्द बनतो, त्याला अर्थ कसा आणि केव्हा प्राप्त होतो, तो आपल्यापर्यंत कसा पोहोचतो, अर्थाचे वेगवेगळे स्तर कोणते, असे स्तर मानवी भाषेत कसे काय शक्य होतात, अशा अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरं शोधायला शिकवलं जातं संकेतशास्त्र अर्थात Semiotics या विषयात.

 

मग हे शब्द एकत्र येऊन त्यांची वाक्ये बनतात. पण प्रत्येक भाषेत शब्द एका ठराविक क्रमानेच लिहिले जातात. हे क्रम कोणते, ते असे का आहेत, एका वाक्यातील शब्दांचा परस्परसंबंध काय याचा मागोवा घेतं Syntax. हा विषय व्याकरणाच्या थोडा जवळ जाणारा आहे.

 

याखेरीज Semantics, Morphology असेही काही पैलू आहेत, ज्यांच्याशी माझी अद्याप भेट झालेली नाही.

 

तर अशा उच्चारांनी, शब्दांनी, वाक्यांनी, अर्थांनी मिळून बनलेल्या भाषांचा माणसांच्या समुदायावर काय परिणाम होतो, विविध भाषांकडे पाहण्याचा माणसांचा दृष्टीकोन काय असतो, त्यातून शुद्ध भाषा, अशुद्ध भाषा, अशी मिथके कशी प्रसृत होतात वगैरे वगैरे, अशा अनेक प्रश्नांकडे लक्ष पुरवतं ते सामाजिक भाषाशास्त्र म्हणजेच Sociolinguistics.  इथे कळतं की, वेगवेगळ्या ठिकाणी केले जाणारे वेगवेगळे शब्दप्रयोग उदाहरणार्थ पुणेरी मराठीतला ‘मी तुला हसले’ आणि मुंबई मराठीतला ‘मी तुझ्यावर हसले’ या २ शब्दप्रयोगांतील कोणताही चूक किंवा बरोबर नाही. एक शब्दप्रयोग मराठीच्या एका पोटभाषेतला आहे तर दुसरा शब्दप्रयोग दुसऱ्या, एवढंच! असा फरक का पडला याचा मागोवा घेणं हे Sociolinguistics चं  काम!

 

या सर्व भाषांत काही नाती आहेत का, कोणत्या भाषेतून कोणती भाषा उत्पन्न झाली, भूतकाळात मागे गेलं तर या भाषांचं चित्र कसं दिसेल याचे अंदाज बांधतं Historical Linguistics.

 

याखेरीजही Neuro-, Psycho-, Computational, अशा भाषाशास्त्राच्या अनेक शाखा आहेत. Applied Linguistics म्हणजेच उपयोजित भाषाशास्त्र यात अनुवाद इत्यादि अंतर्भूत होते.

 

थोडक्यात, आपण सवयीने आपल्याही नकळत जी भाषा बोलून जातो, तिचा आणि तिच्या समस्त बंधुभगिनींचा जाणीवपूर्वक केलेला अभ्यास म्हणजे भाषाशास्त्र. अर्थात मी वर लिहिलेलं सगळंच बरोबर असेल असं नाही. ३ महिन्यांत माझी भाषाशास्त्राबद्दल झालेली ही समजूत आहे. कदाचित कालौघात या समजूतीत फरकही पडेल. पण तरी हे सगळं Blogवर लिहिण्याचं धाडस करते आहे, यामागे एक छुपा हेतूही आहे. पुन्हा पुन्हा मी बेसावध असताना ‘भाषाशास्त्र म्हणजे काय गं?’ असे प्रश्न विचारणाऱ्यांना द्यायला एक तयार उत्तर असावे, हा! 🙂

Advertisements

8 प्रतिक्रिया (+add yours?)

 1. Prakash Ghatpande
  ऑक्टोबर 15, 2006 @ 14:29:46

  शब्द हे शस्त्र आहे.जपून वापरावे लागते.या अर्थाने तू शस्त्रकारागीर आहे.शास्त्रापुरती डोक्यावर टोपी घालावी लागते.शास्त्रापुरती पूजेत सुपारी ठेवावी लागते. तू कळपात येवू नको.आलीस तर स्वतःला हरवून बसशील.

  उत्तर

 2. Chakrapani
  ऑक्टोबर 15, 2006 @ 21:53:13

  lekh sundar aahe…shevaT tar sahich!! :D…i reemmber asking you questions regarding what it is, what do you study and all…most of them must have been yorkers/bouncers for you at that time but after writing this article, you have hit a sixer…bowlers will think of bowling round the wicket now 😉 😀
  all the best

  उत्तर

 3. हेमंत_सूरत
  ऑक्टोबर 16, 2006 @ 16:53:14

  अर्चना,
  तुझ्या मित्रांबद्दल फ़ारच चांगली माहिती दिलीस. आता तो historical linguistics मित्र आमच्या नागपूरी भाषेवर हिंदीचा पगडा जालिम बसलाय तेही सांगेलच.
  करून राहिलाय, देवून दिलं अन घेवून घेतलं, हसून राहिलाय, पळते बे तो! गाड्या चलाना नही आता तो कायको गाड्या चलाते हो? (दोन लुना मोपेड जेव्हा एकमेकांना टकरावतात तेव्हाची प्रेमाची जुगल्बंदी).
  योग्य वेळेस जरूर लिही याबद्दल.

  उत्तर

 4. गायत्री
  ऑक्टोबर 16, 2006 @ 21:13:02

  आहा. कसला सही विषय निवडला आहेस पदव्युत्तर शिक्षणासाठी!
  तुमची lanuage of instruction इंग्रजी असेल, पण भारतीय भाषांचाही विचार करत असाल ना अभ्यासात? मला एक शंका आहे: ऋ हा रु पासून नक्की वेगळा कसा? म्हणजे एक स्वर आणि दुसरा व्यंजन, असं का?

  उत्तर

 5. rohini gore
  ऑक्टोबर 19, 2006 @ 13:14:24

  excellent!

  उत्तर

 6. प्रमोद देव
  ऑक्टोबर 20, 2006 @ 08:56:19

  अर्चना फारच छान लिहिलेले आहेस. अगदी त्या दिवशी मला समजावुन सांगत होतीस तसेच.
  लिहिले आहेस असे म्हणण्यापे़क्षा छान संवाद साधला आहेस! आवडले!

  उत्तर

 7. Prashant Pardeshi
  ऑक्टोबर 22, 2006 @ 04:46:54

  हा छोटासा लेख मला खुप आवडला। मी स्वतः भाषाशास्त्रज्ञ असुन जपानमधील कोबे विद्यापिठात अध्यापनाचे काम करतो। मराठी भाषेवर काही शोधनिबंध लिहिलेले आहेत। या क्षेत्रामधे बरच काही संशोधन करण्याचा वाव आहे। त्याकरीता शुभेच्छा।
  प्रशांत

  उत्तर

 8. Archana
  ऑक्टोबर 22, 2006 @ 05:05:47

  baap re, Paradeshi mahoday, tumchi pratikriya vachun xanabhar bhiti vatali. kahi chukiche tar nasel na lihile mi lekhat mhanun punha ekda lekh vachun pahila. aso tumchi olakh houn aanand vatala. dhanyawad 🙂

  Ghatpande mahoday, CC, Hemant kaka, Gayatri, Rohini kaku aani Pramod kaka tumha sarvanchehi aabhar! 🙂

  उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: