“The Leaves & the Wind”

‘पिकल्या पानाचे’च रूपक वापरून जॉर्ज कूपर याने “The Leaves & the Wind” नावाची एक सकारात्मक कविता लिहीली आहे. तिचा अनुवाद मी इथे लिहीते आहे-

     अवखळ वारा आज पानांना हाकारी
 “चला मजसवे, मारु आकाशी भरारी
दूर तिथे गगनी हवा थंड बोचरी
ऊबदार पांघरा ती वसने सोनेरी”

ऐकताच हाक वाऱ्यावर आरुढली
पर्णलाट एक आसमंती लहरली
गात मोदभरे ओळखीच्या स्वरावली
आठवांच्या राज्यातून पाने भटकली

“मित्रांनो स्वीकारा अखेरचा दंडवत
नाही ‘अंत’ ही तर ‘आदि’ची सुरुवात
ऐकव ना रे झऱ्या एक निरोपाचे गीत
मैत्र अनेक दिवसांचे ठेव स्मरणात

लेकरांनो परता घरट्यात तुमच्या
पंखाखाली सुरक्षित अपुल्या आईच्या
पाहिल्या आनंदे कैक भराऱ्या तुमच्या
आठवाल का कधी या सावल्या मायेच्या?”

वाऱ्यावर झाली शेवटची भिरभिर
समाधान वसे मनी नाही हूरहूर
भूमीच्या कुशीत होई श्वासांची अखेर
हिम घाली पांघरूण त्यांच्या डोईवर.

                  जॉर्ज कूपर

Advertisements

१ प्रतिक्रिया (+add yours?)

  1. प्रमोद देव
    ऑक्टोबर 12, 2006 @ 09:56:00

    खुपच छान! अर्चना मूळ कविता मी वाचलेली नाही आणि वाचून ती नीट समजेलच असेही नाही. त्यामुळे मला तरी हे स्वतंत्र काव्य वाटते आहे आणि अतिशय उत्कृष्ट अशा काव्यगुणानी युक्त आहे.
    असेच छान-छान लिहिण्यासाठी शुभेच्छा!

    उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: