तमाक्रान्ता यदा दिशः विद्युद्दीपाः प्रकाशन्ते।
दृश्यते तच्चित्रं यथा ताराङ्गणं धराऽरूढम्॥अर्थ- दिशांतून जेव्हा अंधार दाटून येतो, तेव्हा (घरोघरी ) विजेचे दिवे पेटतात व आसमंत उजळून टाकतात. हे दृश्य वरून पाहिले तर धरेवर तारांगण अवतरल्याचाच भास होतो
मालाकाराः इवारामे
भवन्ति सश्रमाः सर्वे।
वृक्षः यदा धनं धत्ते,
पृथ्वी च हरितायते॥
अर्थ- झाडाला जर पैसे लागले, तर जो तो कामधंदे सोडून माळ्याप्रमाणे आपापल्या बागेत घाम गाळू लागेल व [...]
Archive for the ‘श्लोक’ Category
मी रचलेल्या काही संस्कृत समस्यापूर्ति
Posted in श्लोक on September 9, 2006 | Leave a Comment »
कटपयादि सूत्रे
Posted in श्लोक on May 14, 2006 | 3 Comments »
दैनंदिन व्यवहारांमध्ये आपल्याला बर्याचदा काही अनेक आकडी संख्या लक्षात ठेवायला लागतात. उदा.- दूरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक, वाढदिवसाच्या तारखा किंवा असे बरेच काही.
या संख्या लक्षात राहण्यासाठी एक रामबाण उपाय म्हणजे कटपयादि सूत्रे. कटपयादि सूत्र म्हणजे एखादा अंक एखाद्या अक्षराने दाखवणे. उदा.- कुणाचा दूरध्वनी क्रमांक १४६२१८१ असा असेल तर कटपयादि सूत्रांनुसार तो “कवतरपहट” या अक्षरांनी दाखवता येईल. [...]
नांदी
Posted in श्लोक on May 6, 2006 | Leave a Comment »
गेल्या वर्षी आम्ही फर्ग्युसनमहाविद्यालयात सादर केलेली एकांकिका- ‘अक्ष एव जयते’. ही एकांकिका जुगारावर आधारित असल्याने या अक्षक्रीडेचे आद्यदैवत शंकर पार्वती हे नटी सूत्रधार नसतील तरच नवल. तर अशा या एकांकिकेची नांदी आज देते आहे. पार्श्वभूमी समजावून सांगायला हवी, म्हणजे नांदीची मजा येइल. तर हे आमचे शंकर साहेब एकदा अक्षक्रीडेवर फिदा हो उन तिचे गुणगान गाऊ [...]
भर्तृहरीचा एक श्लोक
Posted in श्लोक on April 26, 2006 | Leave a Comment »
आरम्भगुर्वी क्षयिणी क्रमेण लघ्वी पुरा वृद्धिमती च पश्चात्।
दिनस्य पूर्वार्धपरार्धभिन्ना छायेव मैत्री खलसज्जनानाम्॥
दिवसभरात सूर्यामुळे पडणारी सावली सतत आपला आकार बदलत असते. सकाळी सूर्य उगवतो तेव्हा लांबच लांब सावली पडते. पण सूर्य जसजसा आकाशात वर वर चढू लागतो, तसतसा तिचा आकार कमीकमी होत जातो. व शेवटी सूर्य डोक्यावर येतो, तेव्हा तर ही सावली गायबच होते. तशीच दुष्ट [...]
वधूपरीक्षा
Posted in श्लोक on April 25, 2006 | Leave a Comment »
कार्येषु मन्त्री करणेषु दासी भोज्येषु माता शयनेषु रम्भा।
धर्मानुकूला क्षमया धरित्री भार्या च षाड्गुण्यवतीह दुर्लभा॥
- एखाद्या उपवधू मुलाने ‘पर उसमे वो बात नही यार…!” असं म्हणत बऱ्याच जणींना नकार देऊन मग हे सुभाषित रचले असावे, असे का कोण जाणे पण मला नेहमी वाटते. या महाशयांची ‘वधू कशी पाहिजे’ ही यादी अंमळ लांबलेलीच दिसते.
कोणत्याही कार्याची सुरुवात [...]
सरस्वतीचा खजिना
Posted in श्लोक on April 25, 2006 | Leave a Comment »
अपूर्वः कोऽपि कोषोऽयं विद्यते तव भारति।
व्ययतो वृद्धिमायाति क्षयमायाति सञ्चयात्॥
प्रत्येक देवतेची काही ना काही खासियत असते. कोणा इंद्राकडे संहारक अस्त्र असतं, कोणा कृष्णाकडे जगन्मोहिनी बासरी असते, कोणा लक्ष्मीकडे दामाजीपंत असतात, तशी ही आपणा सर्वांना वंदनीय अशी वाग्देवता, हिच्याकडे एक जादूचा खजिना आहे. या खजिन्यातलं द्रव्य इतरांमध्ये वाटलं, की कमी न होता उलट वाढतं. आणि कुणालाही न [...]
श्रीगणेशा
Posted in श्लोक on April 25, 2006 | 1 Comment »
[...]