Feed on
Posts
Comments

Archive for April, 2007

Recap- उदयन काही कामानिमित्त मगधदेशी गेला असता राजा दर्शकाने आपली बहिण पद्मावती हिच्यासाठी उदयनाला मागणी घातली. उदयनाने होकार दिला व लगेच त्याच दिवशी त्यांचे लग्न झाले. त्यातच पद्मावतीची विवाहमाला गुंफण्याचं काम वासवदत्तेकडे आल्याने तिच्या दु:खात भरच पडली. इथवर सगळं तसं अपेक्षित मार्गावरूनच चाललं आहे, पण आता सुरू होतात अनपेक्षित वळणं-
अंक चौथा
हा माझा सर्वांत आवडता अंक [...]

Read Full Post »

Recap
आधीच्या भागात लिहीताना फारच गुंतागुंत झाली बहुधा. म्हणुन पहिल्या अंकातलं कथानक अगदी थोडक्या शब्दांत-
राजा उदयन त्याची राणी वासवदत्ता हिच्यावरच्या आत्यंतिक प्रेमापुढे राज्यकारभाराला दुय्यम स्थान देतो व परिणामी बरंचसं राज्य हातातून जातं. उदयनाला प्रेमातून बाहेर काढून राज्यकारभारात पुन्हा लक्ष घालण्यास प्रवृत्त करण्यासाठी त्याचा अमात्य यौगंधरायण स्वत:च्या व वासवदत्तेच्या मृत्युचं नाटक करतो. ते दोघे वेषांतर [...]

Read Full Post »

तपोवनाचा शांत परिसर. त्याच्या मधोमध उभ्या २ व्यक्ती- संन्यासाचा वेश धारण केलेला एक पुरुष आणि त्याच्यासोबत अवंती नगरीतल्या स्त्रियांसारखी वेषभूषा केलेली एक स्त्री. या दोन व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून खुद्द यौगंधरायण आणि वासवदत्ता आहेत. वेषांतर करून एका तपोवनात आले आहेत.
इतक्यात कुठूनतरी आरडाओरडा ऐकू येतो- ‘बाजूला व्हा, दूर हटा’. इथूनच तुम्हाला भासाचं एक [...]

Read Full Post »

भासाने उदयनकथेवर २ नाटकं लिहिली. त्यापैकी पहिलं ‘प्रतिज्ञायौगंधरायण’ आणि दुसरं ‘स्वप्नवासवदत्तम’. ‘प्रतिज्ञा….’ जिथे संपतं त्याच्या काही काळानंतर ‘स्वप्न….’ चं कथानक उलगडतं. त्यामुळे ‘प्रतिज्ञा….’ ची थोडी ओळख करून देणं गरजेचं आहे.
उदयन हा एक नवतरुण राजा आणि त्याला राज्यकारभारात सल्ला देऊन मदत करणारा त्याचा तीक्ष्णबुद्धी, अत्यंत विश्वासू असा अमात्य- यौगंधरायण यांच्याभोवती अख्खं कथानक फिरतं. आपला नायक- [...]

Read Full Post »

कित्येक दिवसांपासून मला माझ्या ‘स्वप्नवासवदत्तम’ या आवडत्या नाटकाबद्दल लिहायचं होतं. परवाच परीक्षा संपली आणि आज मुहूर्त सापडला.
संस्कृत नाटकं म्हटली की तोंडात पहिलं नाव येतं ते कालिदासाचं. एक कालिदास सोडता इतर संस्कृत नाटककारांची नावे फारच कमी जणांना माहित असतात. कदाचित संगीत नाटकं पाहिलेल्या पिढीला भास, शूद्रक, विशाखदत्त वगैरे नावं माहित असतील.
मी स्वत: या [...]

Read Full Post »