Feed on
Posts
Comments

Archive for November, 2006

लेखक
आई, तू तर म्हणतेस की बाबा बरीच पुस्तकं लिहितात, पण त्यात ते एवढं काय लिहितात? मला तर बुवा काही समजतच नाही. आज ते संध्याकाळभर तुला त्यांची पुस्तकं वाचून दाखवत होते ना, तुला तरी कळला का गं त्याचा अर्थ?
तू आम्हाला किती छान छान गोष्टी सांगतेस गं! मला नेहमी प्रश्न पडतो की बाबा असं का नाही [...]

Read Full Post »

हे म्हणजे अगदी स्वैर-स्वैर-स्वैर भाषांतर आहे.
 
चाफा
 
समज, मी जर असंच मजा म्हणून चाफ्याचं फूल झालो तर? मग मी झाडाच्या सर्वांत उंच फांदीवर चढून बसेन आणि वाऱ्याच्या झुळकेबरोबर मजेत झोके घेत पालवीवर नाचेन, मग तू मला ओळखशील का गं आई?
तू हाक मारत राहशील, “सोन्या, कुठे आहेस रे तू?” तेव्हा मी स्वत:शीच हसेन पण अगदी चिडीचूप बसेन.
नंतर [...]

Read Full Post »

हेमंतकाकांनी म्हटल्याप्रमाणे टागोरांच्या लेखनाला अर्थाचे विविध पदर असतात. पण तरीही मला जमेल तसं समजून घेत त्याचं मराठीत रुपांतर करण्याचं धाडस करते आहे, जरा सांभाळून घ्या.
 
खगोलशास्त्रज्ञ
 
मी फक्त एवढंच म्हणालो, “संध्याकाळच्या वेळी किनई तो गोलमटोल चांदोबा जेव्हा कदंबाच्या फांद्यांत अडकून पडतो, तेव्हा कुणाला तो हातात घेता येईल का?”
पण दादा जोरात हसला आणि म्हणाला, “तू जगातला सगळ्यात बावळट [...]

Read Full Post »

त्या पुस्तकातल्या माझ्या सर्वांत आवडत्या लेखाचा स्वैर अनुवाद करण्याचा प्रयत्न-
 
फुलांची शाळा
 
ए आई, तुला माहित आहे का, ते काळेकुट्ट ढगोबा जेह्वा आकाशात गडगडू लागतात आणि मग पहिला पाऊस खाली येतो ना, तेव्हा वेडं वारं वेळूच्या बेटात शिरतं आणि बांबूच्या आडून शीळ घालू लागतं.
 
आणि मग अचानक, कुठून कुणास ठाऊक, पण भरपूर फुलं बाहेर येतात आणि गवतावर [...]

Read Full Post »

चंद्रकोर

कालच चर्चगेटची बुक स्ट्रीट फिरता फिरता रविंद्रनाथ टागोर यांचं ‘The Crescent Moon’ हे पुस्तक अवघ्या १० रु. ना मिळालं. टागोरांचं पुस्तक म्हणून मी मोठ्या कुतुहलाने विकत घेतलं आणि आज सकाळी वाचायला म्हणून ते जे हातात घेतलं, ते पूर्ण वाचूनच खाली ठेवलं.
तळहाताएवढ्या या इवल्याशा पुस्तकात टागोरांच्या ४१ बंगाली कवितांच्या त्यांनी स्वत: केलेल्या इंग्रजी अनुवादांचा संग्रह आहे. [...]

Read Full Post »