Feed on
Posts
Comments

Archive for September, 2006

अनुवाद

अश्कोंमें जो पाया है, वो गीतोंमें दिया है
इसपर भी सुना है के जमाने को गिला है
गीतांस तव मिळाले, हे दान आसवांचे,
दुनियेस हाय परि या, ना भान आसवांचे,
तव नाव जन विसरले, तरी मागतेस दाद?
स्वीकार तू नव्याने, हे गान आसवांचे!

Read Full Post »

आताच्या काळात जशी व्यावहारिक बाबींची माहिती देणारी पुस्तके लिहिली जातात तसाच ५व्या/६व्या शतकात वराहमिहिराने बृहत्संहिता नामक ग्रंथ लिहिला. अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने व बारकाईने लिहिलेल्या या ग्रंथाला आजच्या पुस्तकांच्या रांगेत बसवणे तसे चूकच! या ग्रंथाच्या १०७ अध्यायांच्या यादीवर एकवार नुसती नजर जरी टाकली तरी त्यातील विषयवैविद्ध्याने थक्क व्हायला होते. आकाशातले चमत्कार, अंतरीक्षातल्या घडामोडी, त्यांचे त्याकाळच्या उपलब्ध [...]

Read Full Post »

नभी दूर दिन मावळू लागे
सांजवधुही पदर सावरीत भूवरी उतरे
मम मनाच्या गाभार्‍यात
कोण गे उजळे हे स्वप्नदिवे , हे स्वप्नदिवे …
क्षणी एका अवचित श्वास जडावे
पळी त्याच नयनांत जलद दाटले
येइ जवळ कोणी प्रेमभराने
स्पर्श करी पण नजर ही चुकवे , नजरही चुकवे …
कधी गीत मीलनाचे राही अधुरे
तर कुठे जुळे नाते जन्मांतराचे
अडके गुंती , वैरी मन माझे,
मज छळी साहुनी ते [...]

Read Full Post »

‘पिकल्या पानाचे’च रूपक वापरून जॉर्ज कूपर याने “The Leaves & the Wind” नावाची एक सकारात्मक कविता लिहीली आहे. तिचा अनुवाद मी इथे लिहीते आहे-
     अवखळ वारा आज पानांना हाकारी
 ”चला मजसवे, मारु आकाशी भरारी
दूर तिथे गगनी हवा थंड बोचरी
ऊबदार पांघरा ती वसने सोनेरी”
ऐकताच हाक वाऱ्यावर आरुढली
पर्णलाट एक आसमंती लहरली
गात मोदभरे ओळखीच्या स्वरावली
आठवांच्या राज्यातून पाने भटकली
“मित्रांनो स्वीकारा [...]

Read Full Post »

नमस्कार मंडळी,
     ‘न मुह छुपाके जीयो’ या गीताचे वेगळ्या पद्धतीने रुपांतरण करते आहे.
घाबरूनी तू मुखाला, लपविणे नाही बरे
लाजुनी तू मस्तकाला, झुकविणे नाही बरे
काळ हा आला समोरी, दुःख घेऊनी जरी
जीवनातल्या सुखांना, हरवणे नाही बरे
   मेघमालेआड मंडळ। तारकांचे ते सरे
जाणुनी अदृष्य त्यांसी। शापणे नाही बरे
दाटला अंधार रात्री । हरवले रस्ते जरी
दीप आशेचे तरीही। विझवणे नाही बरे
एकएका पायरीला। गाठुनी तू जा पुढे
लक्ष्य झाले प्राप्त म्हणुनी। थांबणे [...]

Read Full Post »

मूळ कविता:-
मौत तू एक कविता है
मुझसे एक कविता का वादा है, मिलेगी मुझको.
डूबती नब्जोंमे में जब दर्द को नींद आने लगे
जर्द सा चेहरा लिये चांद उफ़क तक पहुंचे
दिन अभी पानीमें हो रात किनारेके करीब
न अंधेरा न उजाला हो न अभी रात न दिन
जिस्म जब खत्म हो और रूह को जब सांस आये
मुझसे एक कविता का [...]

Read Full Post »

 

कोणे एके नाताळी
नाताळची पूर्वसंध्या! भिंतीवर पायमोजे टांगून, दारं-खिडक्या फुलांच्या माळांनी सजवून, ‘खिसमस ट्री’ खाली भेटवस्तूंचा छोटासा ढीग रचून घर शांतपणे नाताळाच्या स्वागतासाठी सज्ज! हे प्रतीक्षेचे क्षण मी मनाच्या एका कप्प्यात साठवून ठेवते- दरवर्षी , न चुकता. माझं घर जणु त्या क्षणी भूतकाळाच्या आठवणींतून जिवंत होतं, गतकाळाबद्दल कृतार्थ होतं आणि [...]

Read Full Post »

तमाक्रान्ता यदा दिशः विद्युद्दीपाः प्रकाशन्ते।
  दृश्यते तच्चित्रं यथा ताराङ्गणं धराऽरूढम्॥अर्थ- दिशांतून जेव्हा अंधार दाटून येतो, तेव्हा (घरोघरी )  विजेचे दिवे पेटतात व आसमंत उजळून टाकतात. हे दृश्य वरून पाहिले तर धरेवर तारांगण अवतरल्याचाच भास होतो
मालाकाराः इवारामे
भवन्ति सश्रमाः सर्वे।
वृक्षः यदा धनं धत्ते,
पृथ्वी च हरितायते॥
अर्थ-  झाडाला जर पैसे लागले, तर जो तो कामधंदे सोडून माळ्याप्रमाणे आपापल्या बागेत घाम गाळू लागेल व [...]

Read Full Post »